पोलीस टाईम्स न्यूज १८
ताज्या घडामोडी

अवैध सुगंधी तंबाखू कारखान्यावर संयुक्त धाड; १९ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांची चौकशी सुरू

कोल्हापूर जिल्ह्यातील तारदाळ–खोतवाडी मार्गावरील आयोध्या नगर परिसरात सुरू असलेल्या अवैध सुगंधी तंबाखू (मावा) निर्मिती कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन आणि शहापूर पोलिसांनी संयुक्तपणे धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल १९ लाख रुपयांचा कच्चा माल, रसायने, पॅकिंग साहित्य आणि यंत्रसामग्री जप्त करण्यात आली असून कारखान्याचा मालक व तीन कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारखान्यात मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखू तयार करून त्याची विक्री केली जात होती. छाप्यात मॅन्थॉल, ग्लिसरीन, विविध रसायने, सुगंधी तंबाखूचा कच्चा माल, पॅकिंग साहित्य तसेच उत्पादनासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री जप्त करण्यात आली.
या प्रकरणी कारखान्याचे मालक विनायक मुठाणे तसेच कर्मचारी अविनाश कोळेकर, पुनाराम नाईक आणि गोपाल नाईक यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. संबंधितांविरोधात अन्न सुरक्षा व मानके कायद्यासह अन्य लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत पाटील, विजय पाचपुते, शहापूर पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार आणि त्यांच्या पथकाने संयुक्तपणे केली.
या धाडीनंतर परिसरात आणखी किती अवैध मावा कारखाने सुरू आहेत, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, हा कारखाना गेल्या वर्षभरापासून सुरू असल्याची चर्चा असताना प्रशासनाची कारवाई इतक्या उशिरा का झाली, याबाबतही नागरिकांमध्ये विविध तर्कवितर्क व्यक्त होत आहेत.

Related posts

२४ तासांत चोरीचा उलगडा; ₹५.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त.

मार्केट यार्डातील पान शॉपवर छापा; प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त

विवाहित महिलेला फोन वरुन म्हणाला तू मला खूप आवडतेस:एका विरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल

वेदांत बंडगर हत्येच्या निषेधार्थ सांगलीत कॅन्डल मार्च; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

गर्दीतून सोडवायला गेलेल्या पोलिसांवरच हल्ला; मद्यधुंद वाहनचालकाविरुद्ध कारवाई

वेदांत बंडगर खून प्रकरणातील संशयित आरोपीच्या पती-पत्नीचे विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न? प्रकृती चिंताजनक

Leave a Comment

error: ह्या पोर्टल वरच्या बातम्या कॉपी करू नये.