पोलीस टाईम्स न्यूज १८
ताज्या घडामोडी

आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या गाडीचा अर्जुनवाड सर्व्हिस रोडवर अपघात; एअरबॅगमुळे मोठा अनर्थ टळला

सांगली : सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या गाडीचा अर्जुनवाड सर्व्हिस रोडवर अपघात झाला. या अपघातात त्यांच्या हाताच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली असून गाडीतील एअरबॅग वेळेत उघडल्याने मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार सुधीरदादा गाडगीळ हे म्हैशाळहून सांगलीच्या दिशेने येत होते. त्यावेळी अर्जुनवाड सर्व्हिस रोडवर अचानक एक दुचाकीस्वार त्यांच्या गाडीसमोर आल्याने हा अपघात झाला.

या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हाताच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली आहे. गाडीतील एअरबॅग वेळेत उघडल्याने मोठी दुर्घटना टळली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू आहे.

 

Related posts

बनावट नंबरप्लेटचा खेळ उघड! शासनाची फसवणूक करणारे दोघे जाळ्यात; १० लाखांचा आयशर टेम्पो जप्त

वेदांत बंडगर खून प्रकरणातील संशयित आरोपीच्या पती-पत्नीचे विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न? प्रकृती चिंताजनक

जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

गर्दीतून सोडवायला गेलेल्या पोलिसांवरच हल्ला; मद्यधुंद वाहनचालकाविरुद्ध कारवाई

मार्केट यार्डातील पान शॉपवर छापा; प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त

दारूच्या व्यसनाचा वाद ठरला जीवघेणा? झोपेतच पतीचा गळा आवळून खून; पत्नी व कथित प्रियकराला अटक

Leave a Comment

error: ह्या पोर्टल वरच्या बातम्या कॉपी करू नये.