पोलीस टाईम्स न्यूज १८
ताज्या घडामोडी

वेदांत बंडगर हत्येच्या निषेधार्थ सांगलीत कॅन्डल मार्च; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

सांगली जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय वेदांत बंडगर हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज सांगलीत सामाजिक संघटनांच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला.

सांगली-मिरज रोडवरील शहीद अशोक कामटे चौकापासून विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापर्यंत हा कॅन्डल मार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये पीडित बंडगर कुटुंबीयांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

हातात मेणबत्त्या घेऊन सहभागी नागरिकांनी वेदांत बंडगर याला न्याय मिळावा तसेच या प्रकरणातील आरोपींवर कठोर आणि जलद कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. यावेळी परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते.

वेदांत बंडगर यांच्या हत्येने संपूर्ण जिल्हा हादरला असून, या घटनेविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. कॅन्डल मार्चद्वारे वेदांतला श्रद्धांजली अर्पण करत न्यायासाठी एकजूट दाखविण्यात आली.

ब्युरो रिपोर्ट पोलीस टाईम्स न्यूज 18.online 

Related posts

दुचाकीवरून पिस्टल घेऊन आला अन् थेट पोलिसांच्या जाळ्यात अडकला

गर्दीतून सोडवायला गेलेल्या पोलिसांवरच हल्ला; मद्यधुंद वाहनचालकाविरुद्ध कारवाई

तासगाव-विटा परिसरातील मोटारसायकल चोरटे अखेर पोलिसांच्या जाळ्यात

जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

८.७५ लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश:आरोपी अटकेत

अवैध सुगंधी तंबाखू कारखान्यावर संयुक्त धाड; १९ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांची चौकशी सुरू

Leave a Comment

error: ह्या पोर्टल वरच्या बातम्या कॉपी करू नये.