पोलीस टाईम्स न्यूज १८
ताज्या घडामोडी

आटपाडीत 1.07 कोटींचा प्रतिबंधित विमल पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त; एक आरोपी ताब्यात, दुसरा फरार

पोलीसांची मोठी कारवाई; टेम्पो व इर्टीगा वाहनासह कोटींचा मुद्देमाल जप्त*

सांगली जिल्ह्यातील आटपाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विमल पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे. तडवळे-बनपुरी रस्त्यावरील बनपुरी फाटा येथे 17 जून रोजी करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे 1 कोटी 7 लाख 75 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत विमल पानमसाल्याचे विविध प्रकारचे 29,600 पाऊच, तसेच V-1 सुगंधित तंबाखूचे 28,600 पाऊच हस्तगत करण्यात आले. याशिवाय माल वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला अशोक लेलँड टेम्पो (MH 12 VF 7511) आणि मारुती सुझुकी इर्टिगा (MH 12 RT 9302) ही वाहनेही जप्त करण्यात आली.
या प्रकरणी भाऊसाहेब मधुकर जगताप (रा. फुरसुंगी, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले असून तेजस (पूर्ण नाव अज्ञात, रा. कुंजीरवाडी, पुणे) हा आरोपी फरार झाला आहे. आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 205/2026 दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बायस करीत आहेत.

ब्युरो रिपोर्ट महेश पवार पोलीस टाईम्स न्यूज 18.online 

Related posts

८.७५ लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश:आरोपी अटकेत

बनावट नंबरप्लेटचा खेळ उघड! शासनाची फसवणूक करणारे दोघे जाळ्यात; १० लाखांचा आयशर टेम्पो जप्त

तासगाव-विटा परिसरातील मोटारसायकल चोरटे अखेर पोलिसांच्या जाळ्यात

जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

दिवसाढवळ्या कोल्हापूर हादरले: मोक्कातील सराईत गुन्हेगार सुरज साखरेवर भररस्त्यात गोळीबार

लग्नाच्या 20 दिवस आधी काळाचा घाला! ट्रेकिंग दरम्यान दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू

Leave a Comment

error: ह्या पोर्टल वरच्या बातम्या कॉपी करू नये.