पोलीस टाईम्स न्यूज १८
ताज्या घडामोडी

लग्नाच्या 20 दिवस आधी काळाचा घाला! ट्रेकिंग दरम्यान दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू

येत्या वीस दिवसावर लग्न होतं,,,लग्नासाठी सतरा कोटींचा जयपूरमध्ये महाल फायनल केला होता,,,तर पाहुण्यांचा राजेशाही थाट दिसण्यासाठी दोन विमाने देखील बुक केली होती,,या सगळ्या तयारीत असतानाच होणार्‍या बायकोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिला सरप्राइज गिफ्ट देण्याची तयारी सुरू असतानाच नियतीने त्याचा आनंद हिरावून घेतला,,अन एका क्षणात लग्नाच स्वप्न पाहणार्‍या तरुणावर काळाने घाला घातला,,,

केतन अग्रवाल वय-24 रा,पुणे हा पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा,,केतनच लग्न पुढील महिन्यात असून त्यासाठी त्याच्या पसंतीने जयपूर येथे असणार्‍या प्रसिद्ध महालमध्ये लग्न करण्याचे निश्चित करण्यात आले,,त्यासाठी वडिलांनी सतरा कोटी भाडे असलेला जयपुर पॅलेस बुक केले,,दागिण्याची खरेदी झालेली होती,,तर सध्या कपड्यांची खरेदी सुरू होती,,तसेच पाहुण्यांना ने-आण करण्यासाठी दोन विमाने देखील बुक करण्यात आली होती,,सारं काही केतनच्या मनासारखं होत होतं,, मात्र नियतीला त्याचा आनंद आणि राज-वैभव बघवलं नाही,,

19 जून या दिवशी तिच्या होणार्‍या पत्नीचा वाढदिवस असल्याने त्याने हा वाढदिवस साजरा करण्यासाठी महाबळेश्वरला जय्यत तयारी केली होती,,त्यासाठी तो होणार्‍या पत्नीला सरप्राइज गिफ्ट देणार होता,,त्याआधी तो मित्रासोबत होणार्‍या पत्नीला घेवून तो ट्रेकिंगसाठी लोहगडावर आला होता,,मात्र याच लोहगडावर सुमारे साडेतीनशे मीटर खोल दरीजवळ फोटो काढण्यासाठी गेला अन त्याचा तिथे तोल गेला,,अन एका क्षणात होत्याच नव्हतं झालं,,

ही खबर मिळताच काही सामाजिक ट्रेकर,,वनजीव रक्षक संस्थाच्या कार्यकर्त्यांनी खोल दरीत जावून घनदाट जंगलातून केतन याला वर आणले,,पण खोल दरीत पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्याचे त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेने राजेशाहीविवाह सोहळ्याचे स्वप्न एका क्षणात नाहीसे झाल्याने संपूर्ण आग्रवाल कुटुंबावर दुखच डोंगर कोसळलाय,,

Related posts

८.७५ लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश:आरोपी अटकेत

वेदांत बंडगर खून प्रकरणातील संशयित आरोपीच्या पती-पत्नीचे विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न? प्रकृती चिंताजनक

जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

२४ तासांत चोरीचा उलगडा; ₹५.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त.

बनावट नंबरप्लेटचा खेळ उघड! शासनाची फसवणूक करणारे दोघे जाळ्यात; १० लाखांचा आयशर टेम्पो जप्त

आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या गाडीचा अर्जुनवाड सर्व्हिस रोडवर अपघात; एअरबॅगमुळे मोठा अनर्थ टळला

Leave a Comment

error: ह्या पोर्टल वरच्या बातम्या कॉपी करू नये.