
सांगली जिल्ह्याला हादरवणारी वेदांत बंडगर खून घटनेतील संशयित आरोपी सागर चौगुले व त्याच्या बायकोने कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

मिरजेतील शासकीय रुग्णालयात दोघांवर उपचार सुरू असून सागर याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजत आहे. सागर चौगुले याचा या खुनाशी काही संबंध नाही असा नातेवाईकाने आरोप केला आहे, खुनाच्या दिवशी सागरला पोलिसांनी मारहाण केली व पुन्हा सोडून दिलं पोलिसांच्या मारहाणीच्या त्रासाला कंटाळून हे कृत्य केल्या असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे सागरचं बरं वाईट झालं तर कवठेमंकाळ पोलीस जबाबदार असतील असा इशारा सागरचे भाऊ यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.
सागरचं बरं वाईट झालं तर पोलीस स्टेशन जबाबदार राहील व आम्हीही विष प्राशन करून आत्महत्या करू असा इशारा सागरच्या आईने दिला आहे.
ब्युरो रिपोर्ट पोलीस टाईम्स न्यूज 18.online
