पोलीस टाईम्स न्यूज १८
ताज्या घडामोडी

२४ तासांत चोरीचा उलगडा; ₹५.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त.

सांगली, दि. १८ जून: सांगली ग्रामीण पोलिसांनी दाखल चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत छडा लावत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून सुमारे ₹५ लाख १९ हजार ३०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. शरयू अनिल निगटे (वय २६, रा. विष्णुधाम नगर, मिरज) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यांची मोटारसायकल बुधगाव नाका परिसरात खराब झाल्याने त्यांनी ती रस्त्याच्या कडेला उभी केली होती. त्यावेळी मोटारसायकलवर ठेवलेला मोबाईल फोन आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी गुन्हा क्रमांक १८२/२०२६ अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारायकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत आणि पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे बुधगाव-बिसूर रस्त्यावर चोरीचा मोबाईल विक्रीसाठी आलेल्या संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

चौकशीदरम्यान तेजस तानाजी पाटील (वय २७, रा. राजवाडा चौक, बुधगाव) आणि अनिकेत लक्ष्मण जाधव (वय २५, रा. राजवाडा चौक, बुधगाव) यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल, रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ₹५ लाख १९ हजार ३०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई सहाय्यक पोलीस फौजदार मेघराज रुपनर, विजय घोलप, पोलीस हेड कॉन्स्टेबल बंडू पवार, अभिजीत पाटील, रणजीत घार्गे तसेच पोलीस कॉन्स्टेबल आप्पा कोळी आणि हिम्मत शेख यांनी केली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बंडू पवार करीत आहेत.

Related posts

लग्नानंतरही विकृताचा पाठलाग: विवाहितेचे असशील फोटो व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल

वेदांत बंडगर हत्येच्या निषेधार्थ सांगलीत कॅन्डल मार्च; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या गाडीचा अर्जुनवाड सर्व्हिस रोडवर अपघात; एअरबॅगमुळे मोठा अनर्थ टळला

बनावट नंबरप्लेटचा खेळ उघड! शासनाची फसवणूक करणारे दोघे जाळ्यात; १० लाखांचा आयशर टेम्पो जप्त

तडीपार सराईत आरोपीला मिरज शहर पोलिसांनी केले जेरबंद

८.७५ लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश:आरोपी अटकेत

Leave a Comment

error: ह्या पोर्टल वरच्या बातम्या कॉपी करू नये.