पोलीस टाईम्स न्यूज १८
ताज्या घडामोडी

तडीपार सराईत आरोपीला मिरज शहर पोलिसांनी केले जेरबंद

मिरज शहरातील चोगुले मळा, झोपडपट्टी, म्हैशाळ रोड परिसरात तडीपार आरोपी फिरत असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शानूर करीम मुजावर (वय ३८, रा. चोगुले मळा, मिरज) याला अटक केली.

उपविभागीय दंडाधिकारी मिरज यांनी दिलेल्या आदेशानुसार आरोपीला सांगली जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र कोणतीही पूर्वपरवानगी न घेता तो मिरज शहरात वास्तव्यास असल्याचे आढळून आले.
या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वीही खून, मारामारी, जबरी चोरी तसेच धारदार शस्त्र बाळगण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Related posts

लग्नानंतरही विकृताचा पाठलाग: विवाहितेचे असशील फोटो व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल

आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या गाडीचा अर्जुनवाड सर्व्हिस रोडवर अपघात; एअरबॅगमुळे मोठा अनर्थ टळला

दिवसाढवळ्या कोल्हापूर हादरले: मोक्कातील सराईत गुन्हेगार सुरज साखरेवर भररस्त्यात गोळीबार

आटपाडीत 1.07 कोटींचा प्रतिबंधित विमल पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त; एक आरोपी ताब्यात, दुसरा फरार

दारूच्या व्यसनाचा वाद ठरला जीवघेणा? झोपेतच पतीचा गळा आवळून खून; पत्नी व कथित प्रियकराला अटक

विवाहित महिलेला फोन वरुन म्हणाला तू मला खूप आवडतेस:एका विरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल

Leave a Comment

error: ह्या पोर्टल वरच्या बातम्या कॉपी करू नये.