पोलीस टाईम्स न्यूज १८
ताज्या घडामोडी

८.७५ लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश:आरोपी अटकेत

मुख्य संपादक महेश पवार 9579951540

 

जनतेच्या विश्वासाला सार्थ ठरवत शाहूपुरी पोलिसांची मोठी कामगिरी

८.७५ लाखांच्या घरफोडीचा अवघ्या काही दिवसांत उलगडा; सोन्याचे दागिने व दोन लाखांची रोकड जप्त

गुन्हेगारांचा अचूक माग काढत जनतेच्या विश्वासाला सार्थ ठरवणारी उल्लेखनीय कामगिरी शाहूपुरी पोलिसांनी केली आहे. ईरा गार्डन, मुक्त सैनिक वसाहत, काटे मळा परिसरात झालेल्या ८ लाख ७५ हजार रुपयांच्या घरफोडीचा अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश करत पोलिसांनी आरोपीला अटक केली असून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे

फिर्यादी शिवाजी आकाराम पाटील (वय ६५) यांच्या राहत्या घरात ५ जूनच्या सायंकाळी ते ६ जूनच्या पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने चावीच्या सहाय्याने प्रवेश करून देव्हाऱ्यातील आणि कपाटातील सोन्याचे दागिने तसेच २ लाख रुपयांची रोकड चोरून नेली होती. यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने घराला आग लावून नुकसान केल्याची धक्कादायक बाबही समोर आली होती.

या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३२६ (ग), ३०५ (अ) आणि ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सुरू असताना शाहूपुरी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने छाननी केली. तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेतला.
तपासादरम्यान आशिष जयकुमार पाटील (वय २४, रा. मुक्त सैनिक वसाहत, ईरा गार्डन, कोल्हापूर) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीतून त्याच्याकडून चोरीतील ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, १५ ग्रॅम वजनाचा कोल्हापुरी साज, ११ सोन्याच्या अंगठ्या आणि २ लाख रुपयांची रोकड असा एकूण ८ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या यशस्वी कारवाईमुळे नागरिकांमध्ये शाहूपुरी पोलिसांविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला असून, गुन्ह्यांचा जलद आणि प्रभावी तपास करण्याच्या पोलिसांच्या क्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव आणि पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार, आकाश जाधव तसेच मिलिंद बांगर, बाबासाहेब ढाकणे, अमोल पाटील, कृष्णात पाटील, रविकुमार आंबेकर, महेश पाटील, गौरव शिंदे, राहुल पाटील, सुशीलकुमार गायकवाड, सनिराज पाटील, सचिन पांगे आणि उत्तम पाटील यांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.

Related posts

बनावट नंबरप्लेटचा खेळ उघड! शासनाची फसवणूक करणारे दोघे जाळ्यात; १० लाखांचा आयशर टेम्पो जप्त

दारूच्या व्यसनाचा वाद ठरला जीवघेणा? झोपेतच पतीचा गळा आवळून खून; पत्नी व कथित प्रियकराला अटक

दुचाकीवरून पिस्टल घेऊन आला अन् थेट पोलिसांच्या जाळ्यात अडकला

मार्केट यार्डातील पान शॉपवर छापा; प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त

जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

दिवसाढवळ्या कोल्हापूर हादरले: मोक्कातील सराईत गुन्हेगार सुरज साखरेवर भररस्त्यात गोळीबार

Leave a Comment

error: ह्या पोर्टल वरच्या बातम्या कॉपी करू नये.