पोलीस टाईम्स न्यूज १८
ताज्या घडामोडी

दिवसाढवळ्या कोल्हापूर हादरले: मोक्कातील सराईत गुन्हेगार सुरज साखरेवर भररस्त्यात गोळीबार

कोल्हापूर शहरातील नवीन वाशी नाका परिसरात गुरुवारी भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. या घटनेत मोक्कातील सराईत गुन्हेगार सुरज साखरे हा जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या परिसरात सुरज साखरे यांचे कार्यालय ही आहे कार्यालयातून बाहेर पडताना मोपेड दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हा गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे.

खाजगी सावकारीतुन गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी करत पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली आहे. गोळीबाराचे नेमके कारण, हल्लेखोरांची संख्या तसेच त्यांनी घटनास्थळावरून कशा प्रकारे पलायन केले, याचा तपास सुरू आहे.
तपासाचा भाग म्हणून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी, प्रत्यक्षदर्शींची चौकशी आणि अन्य तांत्रिक पुराव्यांचे संकलन सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेनंतर नवीन वाशी नाका परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, या प्रकरणातील अधिकृत माहिती तपास पूर्ण झाल्यानंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, जखमीची प्रकृती, गोळीबारामागील कारण आणि संशयितांविषयीची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसून, पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

Related posts

वेदांत बंडगर खून प्रकरणातील संशयित आरोपीच्या पती-पत्नीचे विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न? प्रकृती चिंताजनक

कुपवाडात गांजा विक्रीसाठी आलेला युवक पोलिसांच्या जाळ्यात; गांजा व मोटारसायकल जप्त

८.७५ लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश:आरोपी अटकेत

२४ तासांत चोरीचा उलगडा; ₹५.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त.

दारूच्या व्यसनाचा वाद ठरला जीवघेणा? झोपेतच पतीचा गळा आवळून खून; पत्नी व कथित प्रियकराला अटक

मार्केट यार्डातील पान शॉपवर छापा; प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त

Leave a Comment

error: ह्या पोर्टल वरच्या बातम्या कॉपी करू नये.