पोलीस टाईम्स न्यूज १८
ताज्या घडामोडी

कुपवाडात गांजा विक्रीसाठी आलेला युवक पोलिसांच्या जाळ्यात; गांजा व मोटारसायकल जप्त

 

कुपवाड : अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत एमआयडीसी कुपवाड पोलिसांनी मोठी कारवाई करत गांजा विक्रीसाठी आलेल्या एका युवकाला ताब्यात घेतले. आरोपीकडून ८०६ ग्रॅम गांजा आणि एक मोटारसायकल असा एकूण ६० हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याचे अंमलदार अविनाश पाटील व संदीप गस्ते यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, अभिजीत बजरंग हांडे (वय २४, सध्या रा. ग्रीन पार्क गल्ली नं. १, पोलीस कॉलनी, कुपवाड, मूळ रा. निरवाड, ता. जत, जि. सांगली) हा स्वामी मळा स्मशानभूमी परिसरात गांजा विक्रीसाठी येणार आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापळा रचला. संशयित युवकाला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे २० हजार १५० रुपये किमतीचा ८०६ ग्रॅम गांजा आढळून आला. तसेच ४० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस मोटारसायकलही जप्त करण्यात आली.
या कारवाईत एकूण ६० हजार १५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून नागरिकांनी अमली पदार्थांची विक्री, वाहतूक किंवा साठा याबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related posts

दिवसाढवळ्या कोल्हापूर हादरले: मोक्कातील सराईत गुन्हेगार सुरज साखरेवर भररस्त्यात गोळीबार

लग्नाच्या 20 दिवस आधी काळाचा घाला! ट्रेकिंग दरम्यान दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू

बनावट नंबरप्लेटचा खेळ उघड! शासनाची फसवणूक करणारे दोघे जाळ्यात; १० लाखांचा आयशर टेम्पो जप्त

जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

८.७५ लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश:आरोपी अटकेत

लग्नानंतरही विकृताचा पाठलाग: विवाहितेचे असशील फोटो व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल

Leave a Comment

error: ह्या पोर्टल वरच्या बातम्या कॉपी करू नये.