पोलीस टाईम्स न्यूज १८
ताज्या घडामोडी

मार्केट यार्डातील पान शॉपवर छापा; प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त

महाराष्ट्रात बंदी असतानाही प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित सुपारीचा साठा करून विक्री केल्याप्रकरणी शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मार्केट यार्ड परिसरातील पान शॉपवर कारवाई करत विविध प्रकारचा प्रतिबंधित माल जप्त केला.

अन्न सुरक्षा अधिकारी विश्वजित शिवाजी गुजर यांच्या फिर्यादीवरून विक्रमनगर येथील प्रशांत शिवाप्पा रायगोंडा (वय २४) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १६) दुपारी साडेएकच्या सुमारास मेनन रोड, मार्केट यार्ड येथील रायगोंडा पान शॉपची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान विमल पान मसाला, मुसाफिर पान मसाला, आरएन सुगंधित सुपारी, एम-४ रॉयल जाफरानी जर्दा, आरएमडी पानमसाला, डायरेक्टर स्पेशल पानमसाला तसेच मावा सुगंधित मिश्रित तंबाखू असा एकूण ९३ पुड्यांचा साठा आढळून आला. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत २ हजार ५६५ रुपये असल्याचे सांगण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने गुटखा, पानमसाला व तत्सम तंबाखूजन्य पदार्थांच्या निर्मिती, साठवणूक, वाहतूक व विक्रीवर बंदी घातलेली असताना आरोपीने हा माल बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सीमा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास खोत करीत आहेत.

Related posts

२४ तासांत चोरीचा उलगडा; ₹५.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त.

दुचाकीवरून पिस्टल घेऊन आला अन् थेट पोलिसांच्या जाळ्यात अडकला

लग्नानंतरही विकृताचा पाठलाग: विवाहितेचे असशील फोटो व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल

बनावट नंबरप्लेटचा खेळ उघड! शासनाची फसवणूक करणारे दोघे जाळ्यात; १० लाखांचा आयशर टेम्पो जप्त

आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या गाडीचा अर्जुनवाड सर्व्हिस रोडवर अपघात; एअरबॅगमुळे मोठा अनर्थ टळला

घरचाच निघाला चोर! मित्राच्या मदतीने दागिने लंपास; ७.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Comment

error: ह्या पोर्टल वरच्या बातम्या कॉपी करू नये.