पोलीस टाईम्स न्यूज १८
आपला जिल्हा

एकाच घरातील दोन सख्खे भाऊ इंडियन आर्मीत; मानकापूरच्या पुजारी कुटुंबाचा अभिमान

मानकापूर गावातील संदीप दादासो पुजारी आणि आनंदा दादासो पुजारी या दोन सख्ख्या भावांची इंडियन आर्मीच्या अग्निवीर भरतीत निवड झाल्याने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकाच घरातील दोन भावांची एकाचवेळी इंडियन आर्मीत निवड होण्याचा मान मानकापूरला प्रथमच मिळाल्याचे सांगितले जात आहे.
देशसेवेची प्रबळ इच्छा आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर संदीप व आनंदा यांनी हे यश संपादन केले आहे. गरीब शेतकरी कुटुंबातील दादासो बापू पुजारी व मंगल पुजारी यांच्या मुलांनी मिळविलेल्या या यशामुळे कुटुंबासह गावाचे नाव उज्ज्वल झाले आहे. त्यांच्या निवडीची बातमी समजताच कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव, सोलापूर आणि विजापूर जिल्ह्यांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दोन्ही भावांची इंडियन आर्मीत निवड झाल्याचे समजताच मानकापूर व परिसरातील नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. गावातून आनंद मिरवणूकही काढण्यात आली. आपल्या दोन्ही मुलांची देशसेवेसाठी निवड झाल्याची बातमी ऐकताच आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
मानकापूरचे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष विठ्ठल कटीकर यांनी पुजारी कुटुंबाच्या निवासस्थानी भेट देऊन संदीप व आनंदा यांचा पुष्पहार घालून सत्कार केला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच ग्रामपंचायत सदस्य राजू कुंभार यांनीही दोन्ही भावांचे अभिनंदन करून त्यांच्या यशाचे कौतुक केले.
एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांची इंडियन आर्मीत निवड झाल्याने मानकापूर गावासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला असून संपूर्ण गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. देशसेवेचा वसा जपत पुजारी बंधूंनी तरुणांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

Related posts

A Large Body of Water on Mars Is Detected, Raising the Potential for Alien Life

aadvaith46@gmail.com

Fish Will Start Losing Sense of Smell as Carbon Dioxide Levels Rise, Study Finds

aadvaith46@gmail.com

‘Amazing Dragon’ Discovery in China Reshapes History of Dinosaurs’ Evolution

aadvaith46@gmail.com

Grieving Orca Carries Dead Calf for More Than 3 Days: ‘She’s Just Not Letting Go’

aadvaith46@gmail.com

In Mozambique, a Living Laboratory for Nature’s Renewal Are On The Way

aadvaith46@gmail.com

Facts About the Natural World Astound and Delight in These Picture Books

aadvaith46@gmail.com

Leave a Comment

error: ह्या पोर्टल वरच्या बातम्या कॉपी करू नये.