पोलीस टाईम्स न्यूज १८
क्राईम

गोव्याहून कोल्हापुरात दारू तस्करीचा डाव उधळला; ८.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त, जीपसह चालक जेरबंद

कोल्हापूर, दि. १५ जून : गोवा बनावटीची विदेशी दारू भरून कोल्हापूरात विक्रीसाठी आणणाऱ्या तस्कराचा डाव करवीर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने उधळून लावत तब्बल ८ लाख ७७ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत जीप, विदेशी दारूचा साठा आणि मोबाईल हस्तगत करण्यात आला असून एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या अवैध धंद्यांविरोधातील कठोर मोहिमेअंतर्गत करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गोपनीय माहिती मिळाली होती. गोव्याहून एक काळ्या रंगाची जीप (क्र. GA-03-Y-1363) मोठ्या प्रमाणात विदेशी दारू घेऊन कोल्हापूरकडे येणार असल्याची माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाला सापळा रचण्याच्या सूचना देण्यात आल्या.

कळंबा नाका परिसरातील हॉटेल सुरभीसमोर पोलिसांनी वॉच ठेवला असता संशयित जीप दिसून आली. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता डिक्कीत खाकी व पांढऱ्या रंगाच्या बॉक्समध्ये गोवा बनावटीच्या विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. चौकशीत चालक गजानन दिनकर पाटील (वय ४९) याच्याकडे दारू बाळगण्याचा किंवा वाहतूक करण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले.

तसेच जप्त करण्यात आलेला माल स्वतःचा असून तो गोव्याहून आणून कोल्हापूर शहरात विक्रीसाठी आणत असल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पंचांसमक्ष केलेल्या मोजणीत १ लाख ६९ हजार २९० रुपयांची विदेशी दारू, ७ लाख रुपयांची जीप आणि ८ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ८ लाख ७७ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकाऱ्यांनी केली.

Related posts

Dell’s Return To Stock Market Leaves A Bitter Taste In Company Finance Future

aadvaith46@gmail.com

Nasdaq Drops More Than 1% as Intel and Twitter Worse Lead Tech Rout

aadvaith46@gmail.com

Under Armour’s Operating Losses, Sponsorships Raise Red Flags For Analysts

aadvaith46@gmail.com

Investors May Cheer Q2 Earnings, But That isn’t Making The Outlook Better

aadvaith46@gmail.com

Facebook’s $100 billion-plus Rout is The Biggest Loss in Stock Market History

aadvaith46@gmail.com

Apple Earnings: Most Boring Quarter of The Year Still Holds Some Intrigue

aadvaith46@gmail.com

Leave a Comment

error: ह्या पोर्टल वरच्या बातम्या कॉपी करू नये.